Anil Kapoor : बॉलीवूड अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. वयाच्या 65 व्या वर्षात ही त्यांचा फिटनेस पाहून सर्वजण अचंबित होतात. नुकतेच त्यांचा ‘अॅनिमल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करत आहे. या चित्रपटातील अनिल कपूर यांच्या भूमिकेचे देखील कौतुक केले जात आहे. ‘अॅनिमल’नंतर आता अनिल कपूर बहुचर्चित ‘फायटर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटातील अनिल कपूर यांचा दमदार लुक रिलीज करण्यात आला आहे.
‘फायटर’मध्ये ग्रुप कॅप्टन राकेश जयसिंग उर्फ रॉकीची भूमिका साकारताना अनिल कपूर दिसणार आहेत. अनिल कपूर यांनी फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, “स्क्वाड्रन लीडर -राकेश जयसिंग, कॉल साइन- रॉकी, डेजिग्नेशन – कमांडिंग ऑफिसर, यूनिट- एयर ड्रॅगन्स’. सध्या अनिल कपूर यांचा हा जबरदस्त लुक प्रेक्षकांच्या देखील पसंतीस पडला आहे. ‘फायटर’ च्या पोस्टरमधील त्याच्या फिटनेसने सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले आहे. ‘फायटर’ सिनेमासाठी अनिल कपूर यांनी भरपूर मेहनत घेतली आहे.
Group Captain Rakesh Jai Singh
Call Sign: Rocky
Designation: Commanding Officer
Unit: Air Dragons
Fighter Forever 🇮🇳 #FighterOn25thJan #Fighter @iHrithik @deepikapadukone @justSidAnand pic.twitter.com/dTcgVtMP7F— Anil Kapoor (@AnilKapoor) December 6, 2023
सिद्धार्थ आनंद ‘फायटर’ चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून हा चित्रपट पुढच्या वर्षी 25 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये हृतिक रोशन, दीपिका पदुकोण, आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात सुपरस्टार अनिल कपूर आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि हृतिक पहिल्यांदा ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहे. ‘फायटर’मध्ये हृतिक, अनिल, दीपिकाचा दिसणार जबरदस्त अॅक्शन सीक्वेंस दिसणार असल्याचीही चर्चा रंगली आहे. हृतिक, अनिल, दीपिका याशिवाय करण सिंग ग्रोव्हर, अक्षय ओबेरॉय, संजीदा शेख, तलत अझीझ देखील पाहायला मिळणार आहेत.