Anil Kapoor – अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) इंस्टाग्रामवरून अचानक गायब झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रकारचे रिपोर्ट्स व्हायरल होऊ लागले होते. एका सूत्राचे म्हणणे आहे की, ‘अनिल कपूरचे सोशल मीडियावरून अचानक गायब होणे हे ‘मिस्टर इंडिया 2′ (Mr India) च्या सुरुवातीचे संकेत आहे. मिस्टर इंडिया (Mr India) (1987) च्या पात्राप्रमाणे अनिल कपूर देखील सोशल मीडियावरून अचानक गायब झाला आहे.’ असं सांगण्यात आलं होत.
अनिल कपूर (Anil Kapoor) इंस्टाग्रामवरून गायब झाल्याने केवळ चाहतेच आश्चर्यचकित झाले नाहीत, तर खुद्द त्यांची मुलगी सोनम कपूरही आश्चर्यचकित झाली. सोनम कपूरने वडिलांच्या इंस्टाग्राम अकाउंटचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आणि विचारले, ‘बाबा?’ असं म्हंटल होत.
View this post on Instagram
मात्र, आता अनिल कपूर (Anil Kapoor) अचानक गायब होण्यामागचं खरं कारण समोर आलं आहे. नुकतंच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, यामध्ये या गोष्टीचा खुलासा करण्यात आला आहे. तब्बल 36 वर्षांनंतर अनिल कपूर यांनी या चित्रपटातील लूकमधील एक व्हिडिओ शेअर केला आहे.
मात्र, हा या चित्रपटाच्या सिक्वेलचा इशारा नसून ‘गुगल पिक्सेल’ मोबाईलची नवी जाहिरात आहे. मिस्टर इंडियाची थीमही जाहिरातीच्या पार्श्वभूमीवर आहे. अनेक वर्षांनंतर अभिनेत्याला या रुपात पाहून चाहते खूप खूश आहेत. मिस्टर इंडिया (Mr India) हा चित्रपट 1987 मध्ये प्रदर्शित झाला होता.