Big Breaking News | अनिल देशमुख यांनी अखेर दिला गृहमंत्री पदाचा राजीनामा

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का दिला असून माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत.  उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये हालचालींना वेग आला आहे. अखेर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

 मुंबई उच्च न्यायालयाकडे अॅड. जयश्री पाटील यांच्याद्वारे दाखल याचिकेमध्ये आज पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सी.बी.आय. मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केलेले आहेत. त्यानुषंगाने मी मंत्री (गृह) या पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही, म्हणून मी स्वत:हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे. मला मंत्री (गृह) या पदावरुन कार्यमुक्त करावे, ही नम्र विनंती, असे राजीनामा पत्र अनिल देशमुख यांनी ट्विटरवर शेअर केले असून लवकरच मुख्यमंत्र्यांकडे सोपविण्यात असल्याचे सांगितले आहे. 

दरम्यान, त्याआधी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रालयात पोहोचले आहे. त्याआधी शरद पवार यांच्या निवासस्थानी अजित पवार आणि शरद पवारांची बैठक झाली. या बैठकीला सुप्रिया सुळे या सुद्धा हजर होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. अखेर अनिल देशमुख यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

Big Breaking; गृहमंत्र्यांवरील आरोपांची होणार सीबीआय चौकशी; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.