Pune Crime | …अखेर भटक्‍या श्‍वानावर अत्याचार करणारा बाबुराव ‘जेरबंद’

पुणे – एका इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने भटक्‍या श्‍वानासोबत अनैसर्गिक संभोग केल्याची घटना मॉडेल कॉलनीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी जेष्ठ सुरक्षा रक्षक बाबुराव मोरे (65) याच्याविरुध्द चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका प्राणीविषयक एनजीओत काम करणाऱ्या महिला कार्यकर्तीने फिर्याद दिली आहे.

बाबुराव मागील काही दिवस असे कृत्य करत असल्याची कुणकुण एका एनजीओशी संबंधीत महिलेला मिळाली होती. त्यानूसार बाबूराववर पाळत ठेऊन त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. यानंतर श्‍वानाची वैद्यकीय तपासणी केली असता, त्याच्यावर बाबूरावने अत्याचार केल्याचे उघड झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉडेल कॉलनीतील एका इमारतीचे सुरक्षा रक्षक म्हणून बाबुराव कामाला आहेत. त्या इमारतीजवळ काही दिवसापासून एक भटकी कुत्री बसत होती. रात्रपाळीला असताना बाबुरावने कुत्रीला इमारतीच्या पार्किंगमध्ये नेऊन अनैसर्गिक कृत्य करत होता. ही घटना तेथील प्राणी संघटनेसाठी काम करणाऱ्या महिलेच्या लक्षात आली. तीने एनजीओशी संपर्क साधून तब्बल तीन दिवस बाबूराव मोरे याच्यावर पाळत ठेवली.

यानंतर बाबूराव भटक्‍या श्‍वानाला उचलून घेऊन खोलीत जात असताना तीने पाहिले. तो अनैसंर्गीक कृत्य करत असतानाच याची खबर इतर कार्यकर्त्यांना देण्यात आली. कार्यकर्ते व प्राण्याच्या वैद्यकीय तज्ञांनी भटक्‍या श्‍वानाला ताब्यात घेऊन त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. यानंतर बाबूराव मोरेला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी बाबुराव याच्यावर प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.