कवठे -कवठे (ता. वाई) येथील अंगणवाडी सेविका तसेच आशा वर्कर्स या दररोज प्रत्येक घरोघरी जाऊन करोनासंदर्भात मार्गदर्शन करत असतात, तसेच याबाबतचा अहवाल प्राथमिक आरोग्य केंद्र कवठे यांना देत असतात. त्यामुळे त्यांची परिसरात रोजच भटकंती होत आहे.
त्या पार्श्वभूमीवर कवठे येथील विन्सटेक कॉम्प्युटर ऍकॅडमीतर्फे गावातील सर्व अंगणवाडी कर्मचारी व आशा वर्कर्स यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले आहे. विन्सटेक कॉम्प्यूटर्सच्या केंद्रप्रमुख करुणा पोळ म्हणाल्या, करोनाच्या आपत्तीमध्ये प्रत्येक घरी जाऊन जबाबदारीने खारीचा वाटा म्हणून करीत असलेल्या आपल्या कामाला प्रोत्साहन मिळावे या उद्देशानेच आम्ही आपणास या छत्र्यांचे वाटप केले आहे. यावेळी अंगणवाडी सेविका सावंत मॅडम यांनी विन्सटेकने प्रोत्साहित केल्याबद्दल आभार व्यक्त केले.