अनमोल जन्म घेतला मी आई-बाबा तुमच्या पोटी
मी झाले लहानाची मोठी
पंख फुटता ऊंच भरारी घ्यावी लागेल उंच आकाशी
मला झोप लागायची आई तु अंगाई गाताना ,
मला खुप दुःख होईल तुम्हाला दुर सोडून जाताना
ञास झाला असेल खुप लहानाचं मोठं करताना,
कधी रागाने तर प्रेमाने समजुन सांगताना ,
दुःख वाटायचे मला तुमच्या कपाळी घाम गळताना,
राञं-दिवस काढले तुम्ही मी आजारी असताना,
मला झोप लागायची आई तु अंगाई गाताना ,
मला दुःख होईल खुप तुम्हाला सोडून दुर जाताना
माझ्याकडून चुकले असेल नकळत काही ,
माफ करा तुम्ही माझे बाबा , माझी आई ,
माझ्या अनमोल जन्माचे ऊपकार कधी फिटणार नाही ,
कधी रागाने , कधी प्रेमाने समजवणारी माझी आई ,
मला झोप लागायची आई तु अंगाई गाताना ,
मला दुःख होईल खुप तुम्हाला सोडून दुर जाताना
कसे फेडावे या
अनमोल जन्माचे ऊपकार ,
आई-बाबा नंतर माहेरी असते ऊन,
आईच्या अंगाई गीताची होईल आठवण ,
पक्षी मधुर गाणी गाताना,
मला झोप लागायची आई तु अंगाई गाताना
मला खुप दुःख होईल तुम्हाला दुर सोडून जाताना.
– कु. अंकिता भिवा लांडे ,
मु.पो. परिते , ता. माढा , जि. सोलापूर