Chandrababu BJP pawan kalyan – भारतीय जनता पार्टीच्या विरोधात स्थापन करण्यात आलेल्या इंडिया आघाडीला जवळपास रोजच नवीन धक्के बसत असतानाच भाजपने मात्र आपले मित्र जोडण्याच्या मोहिमेला चांगलीच गती दिली आहे. काही नवे पक्ष भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएमध्ये सहभागी होत असतानाच काही जुन्या पक्षांनाही आपल्याकडे परत आणण्यात भाजपला यश येते आहे. आंध्र प्रदेशातील तेलगु देसम पक्ष अर्थात टीडीपी त्यापैकी एक आहे. या पक्षाला एनडीएत परत आणण्याची औपचारिकता भाजपने पूर्ण केली असल्याच समोर आलं आहे.
टीडीपीसोबतच तेलगु चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार पवन कल्याण यांचा जनसेना पक्षही एनडीएमध्ये सहभागी झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेशातील जागावाटपही या तीन पक्षांकडून पूर्ण करण्यात आले आहे. | Chandrababu BJP pawan kalyan
नायडू पूर्वीही भाजपसोबत होते व भाजपच्या सरकारमध्ये त्यांना केंद्रात मंत्रिपदही सांभाळले होते. मात्र त्यानंतर दोन्ही पक्षांतील अंतर वाढत गेले आणि नायडू भाजपपासून लांब गेले. पण आता त्यांनी लोकसभा निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे. | Chandrababu BJP pawan kalyan
पवन कल्याण यांनीही एनडीएमध्ये प्रवेश करून आपल्या पक्षाला आता राष्ट्रीय पातळीवरची ओळख प्राप्त करून दिली आहे. भाजप आंध्र प्रदेशात लोकसभेच्या सहा जागा लढणार असल्याचं बोललं जात आहे. विधानसभेच्या निवडणुकीतही भाजपचे २० उमेदवार रिंगणात असतील. चंद्राबाबू यांचा पक्ष लोकसभेच्या १६ जागा लढेल तर पवन कल्याण यांची जनसेना ३ जागा लढणार आहे. | Chandrababu BJP pawan kalyan