देशीगर्ल अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राने हॉलीवूडमध्येही आपली छाप उमटवली आहे. या अभिनेत्रीने काही वर्षांपूर्वी अमेरिकन गायक निक जोन्ससोबत लग्नगाठ बांधली. प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. विशेष म्हणजे ती नेहमी वेगवेगळ्या लुक्समध्ये लोकांसमोर येते. मात्र, नुकत्याच केलेल्या फोटोशूटमुळे तिला ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहे.
View this post on Instagram
प्रियांकाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती लाल रंगाचा जॅकेटसारखा टॉप, तर पांढऱ्या रंगाची धोती पॅंट अशाप्रकारे ड्रेस परिधान केला आहे. तिने परिधान केलेला लाल रंगाचा टॉप जॅकेटसारखा असल्यामुळे त्या टॉपच्यामध्ये ओपन स्पेस आहे. ज्यामुळे त्याच्या आतमध्ये काहीतरी इनरची आवश्यकता असल्याचे वाटते.
View this post on Instagram
मात्र, प्रियांकाने तसे काहीही परिधान न केल्यामुळे तिला ट्रोल करण्यात येत आहे.
दरम्यान, सतत वेगवेगळ्या लुक्समुळे चर्चेत येणारी प्रियांका 2 वर्षांपूर्वी हॉलीवूडच्या रेड कार्पेटवर केलेल्या अजब लुकमुळे प्रचंड चर्चेत आली होती. एवढच नव्हे तर महाराष्ट्रात तिच्या त्या लुकला तात्या विंचूची उपमादेखील दिली गेली होती.