मॉस्को : रशियामध्ये एका लष्कराच्या मालवाहक विमानासोबत मोठी दुर्घटना घडली असल्याचे समोर आले आहे. हे विमान मॉस्कोजवळ क्रॅश झाले असून या घटनेनंतर काही सेकंदातच विमान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. हे विमान क्रॅश होताच परिसरात धुराचे लोट पाहायला मिळाले. दरम्यान, या घटनेचा हा सर्व चित्त थरारक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यात विमान हवेत असतानाच आग लागल्याचे पाहायला मिळते.
एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, Ilyushin Il-112V हे लष्करी वाहतूक विमान तीन लोकांसह मॉस्को क्षेत्रात चाचणी उड्डाणादरम्यान कोसळले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली की नाही हे कंपनीच्या निवेदनातून स्पष्ट झाले नाही.
Horrifying, terribly tragic. Russian new Ilyushin Il-112V prototype aircraft crashes outside Moscow today after what appears to be an engine fire — final moments on camera. Three on board dead. pic.twitter.com/OXwBkZ1ACd
— Shiv Aroor (@ShivAroor) August 17, 2021
मात्र, आरआयए वृत्तसंस्थेने एका अज्ञात सूत्राचा हवाला देत सांगितलं की, क्रूचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेच्या एका व्हिडिओमध्ये विमान कमी उंचीवर उडताना दिसत आहे. याच्या एका पंखाला आग लागलेली आहे.
काही वेळातच हे विमान जमिनीवर कोसळते. हा भयंकर व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. रशियाच्या विमानासोबच याआधीदेखील तुर्कीमध्ये एक दुर्घटना घडली होती. यात 8 जणांचा मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, लँडिगच्या दरम्यान या विमानासोबत ही दुर्घटना घडली होती. या विमानामध्ये रशियाचे पाच तर तुर्कीचे तीन नागरिक होते.