झोया अख्तरच्या आगामी चित्रपटात अनन्या पांडे?

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने अल्पावधीतच चित्रपटसृष्टीत स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आता ती प्रसिद्ध दिग्दर्शक झोया अख्तरच्या आगामी चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

झोया अख्तर ही बॉलिवूडमधील उत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक दिग्दर्शका आहे. तिने “लस्ट स्टोरीज’ आणि “गली बॉय’सारखे अनेक हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. आता अनन्या आणि झोया यांची जोडी जमणार असल्याची चर्चा आहे.

हा चित्रपट सध्या प्री-प्रॉडक्‍शन अवस्थेत असल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भात अद्याप कोणतीही सविस्तर माहिती समोर आलेली नाही. अनन्या आणि झोया यांनी या चित्रपटाला सहमती दर्शविली आहे. अनन्या ही झोयाची मोठी फॅन असून या चित्रपटासाठी ती खूपच उत्सुक आहे.

या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. मात्र या चित्रपटाचे नाव अद्याप निश्‍चित करण्यात आलेले नाही. या चित्रपटाची घोषणा करत लवकरच अन्य स्टारकास्टची माहितीही देण्यात येणार आहे.

वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास “स्टूडेंट ऑफ द ईयर-2′ चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर अनन्या प्रसिद्धीच्या झोतात आली. या चित्रपटाला “बेस्ट डेब्यू’ फिल्मफेयर अवॉर्डदेखील मिळाला होता. याशिवाय “पति, पत्नी और वो’ आणि “खाली पीली’मध्येही तिने निर्णायक भूमिका साकारली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.