आनंद शिंदेंनी केले “143′ चित्रपटातील गाण्यांचे रेकॉर्डिंग

प्रेमाची आगळीवेगळी लव्हेबल केमिस्ट्री घेऊन “143′ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज आहे. या चित्रपटाच्या “आपलं काळीज हाय’ या टॅगलाईनने तर सोशल मीडियावर धुमाकूळच घातला होता. आता या चित्रपटातील दमदार गाणी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास रेकॉर्ड करण्यात आली आहेत. 

गायक आनंद शिंदे यांच्या उपस्थितीत पुणे आणि सांताक्रूझ येथील स्टुडिओमध्ये चित्रपटातील गाण्यांचे रेकॉर्डिंग करण्यात आले. प्रेमाची केमिस्ट्री दाखवणारे या चित्रपटातील लव सॉंग आपली

लाडकी गायिका आर्या आंबेकरच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आले आहे. तर सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी या चित्रपटातील बर्थडे पार्टी सॉंगला त्यांचा स्वरसाज चढवला आहे.

याशिवाय गायिका रेश्‍मा सोनावणे यांनी देखील चित्रपटातील गाण्यांना आपल्या सुमधुर आवाजाची साथ दिली आहे. तसेच पार्श्‍वगायक प्रमोद त्रिपाठी यांनी “143′ चित्रपटात एक कव्वाली गायली आहे.

लवकरच प्रेमाचे लव्हेबल फंडे घेऊन “143′ हा चित्रपट आणि चित्रपटातील दमदार गाणी प्रेक्षकांच्या मनात घर करण्यास सज्ज झाली आहेत. या चित्रपटातील दमदार गाणी प्रेक्षकांना थिरकायला लावणार की नाही हे पाहणे आता रंजक ठरणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.