Anand Mahindra : महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी रविवारी IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली जगातील पहिली फोल्डेबल डायमंड ई-बाईक (सायकल) चालवली. हॉर्नबॅक एक्स१ असे या सायकलचे नाव असून हॉर्नबॅक बाईक्स नावाच्या स्टार्टअपने ती बनवली आहे.
ही सायकल चालवल्यानंतर महिंद्र खूप प्रभावित झाले आणि म्हणाले की इतर फोल्डेबल सायकलपेक्षा ही 35 टक्के अधिक सोयीस्कर आहे. ही एकमेव सायकल आहे जी फोल्ड केल्यानंतर उचलावी लागत नाही. त्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केल्याचेही त्यांनी सांगितले.
ही एकमेव सायकल आहे जी फोल्ड केल्यानंतर उचलावी लागत नाही. ऑफिस कॉम्प्लेक्सभोवती फिरण्यासाठी मी ही सायकल घेतली आहे. मी त्यांच्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. हॉर्नबॅक अॅमेझॉन तसेच फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे, असे आनंद महिंद्रा यांनी म्हंटले आहे. आनंद महिंद्रा यांनी ही सायकल चालवल्यानंतर त्यांनी ती फोल्ड केली आणि त्यांच्या कारच्या ट्रंकमध्ये ठेऊन घरी नेली.
हॉर्नबॅक X1 चे वजन 15 किलो –
हॉर्नबॅक X1 ही डायमंड फ्रेम असलेली फोल्डेबल ई-बाईक (सायकल) आहे. यात 250 वॅटची मोटर आणि 36 व्होल्टची बॅटरी आहे. ही बाईक एका चार्जवर 70 किमी पर्यंत प्रवास करू शकते आणि तिचा टॉप स्पीड ताशी 25 किमी आहे. बाईक देखील खूप हलकी आहे, तिचे वजन फक्त 15 किलो आहे. हे दुमडणे आणि उलगडणे देखील खूप सोपे आहे आणि काही सेकंदात केले जाऊ शकते.