Anand Mahindra : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विक्रांत मेसीचा बहुचर्चित चित्रपट ’12th Fail’ हा 27 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शित झाल्यानंतर ’12th Fail’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली. ओटीटीवर रिलीज झाल्यानंतर देखील या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
’12 वी फेल’ या सिनेमातील विक्रांतच्या कामाने सर्वांना थक्क केलं आहे. चाहते आणि सेलिब्रेटी त्यांचं तोंड भरून कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर सर्वच जण या सिनेमाविषयी आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत.
’12वी फेल’ चित्रपटाचे दिग्दर्शन विधू विनोद चोप्रा यांनी केले. या चित्रपटात विक्रांत मेसी आणि मेधा शंकर यांच्याशिवाय अनंत व्ही जोशी आणि अंशुमन पुष्कर यांनी देखील महत्वाची भूमिका साकारली.
या सिनेमाची गोष्ट खूपच भावनिक आहे. आयपीएस मनोज शर्मा यांच्या संघर्षाची, जिद्दीची, प्रामाणिकपणाची, चिकाटीची, स्वाभिमानाची आणि अपार कष्टांची कथा या सिनेमातून अतिशय सुंदर पद्धतीने उलगडण्यात आली आहे. त्यामुळे सर्वत्र या सिनेमाचं कौतुक सुरू आहे.
अश्यातच आता उद्योजक आनंद महिंद्रा यांनी देखील ’12th Fail’ चित्रपट पाहिला असून इतरांप्रमाणे तेदेखील भारावले आहेत. त्यांनी त्यांच्या ट्विटरवर एक भली मोठी पोस्ट लिहून चित्रपटाचं कौतुक केलं आहे.
यावेळी त्यांनी आपल्या फॉलोअर्सना जर तुम्ही यावर्षी एकच चित्रपट पाहणार असाल, तर तो हा असावा असं सुचवलं आहे. सध्या त्यांच्या या पोस्टने अनेकांचं लक्ष वेधलं आहे.
Finally saw ‘12th FAIL’ over this past weekend.
If you see only ONE film this year, make it this one.Why?
1) Plot: This story is based on real-life heroes of the country. Not just the protagonist, but the millions of youth, hungry for success, who struggle against extrordinary… pic.twitter.com/vk5DVx7sOx
— anand mahindra (@anandmahindra) January 17, 2024
आनंद महिंद्रा यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, “या गेल्या वीकेंडला ’12वी फेल’ चित्रपट पाहिला. जर तुम्ही या वर्षी एकच चित्रपट बघायचं ठरलं तर तुम्ही हा चित्रपट बघा.
1) कथानक : ही कथा देशातील रिअल हिरोवर आधारित आहे. केवळ नायकच नाही, तर लाखो तरुण, यशासाठी भुकेले आहेत, जे जगातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी विलक्षण अडचणींविरुद्ध संघर्ष करतात.
2) अभिनय : विधु चोप्रा यांचे कास्टिंग उत्कृष्ट आहे. प्रत्येक भूमिका उत्कृष्ट पद्धतीनं पार पाडण्यात आली आहे. पण विक्रांत मेस्सीनं राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासाठी पात्र असा ब्रेव्हरा परफॉर्मन्स दिला आहे. तो केवळ भूमिका साकारत नसून तो ती भूमिका जगत होता.
3) नरेटिव्ह स्टाईल : विधू चोप्रा आपल्याला आठवण करून देतात की, चांगला सिनेमा हा उत्तम कथेवर आधारित असतो. माझ्यासाठी मुख्य आकर्षण म्हणजे मुलाखतीचा सीन. होय, हे थोडेसे काल्पनिक वाटू शकते,
परंतु सीनमधील सखोल संवादामुळे हा क्रम तुमच्या डोळ्यांसमोर येतो आणि भारताने नवीन भारत निर्माण करण्यासाठी काय केले पाहिजे हे दाखवतो. मिस्टर चोप्रा, ‘ये दिल मांगे मोर’ यासारखे आणखी चित्रपट बनवा!’