महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी पुन्हा एकदा आपल्या औदार्याने सर्वांची मने जिंकली आहेत. त्यांंनी सर्वात तरुण भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर प्रज्ञानंदच्या पालकांना इलेक्ट्रिक कार भेट दिली आहे.
प्रतिभावान युवा खेळाडू प्रज्ञानंदने अलीकडेच बुद्धिबळ विश्वचषकात चमकदार कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, विजेतेपदाच्या लढतीत दोन दिवसांच्या शानदार खेळानंतर त्याला जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसनविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला, मात्र तो या स्पर्धेतील सर्वात तरुण उपविजेता खेळाडू ठरला. बुद्धिबळ विश्वचषकात 18 वर्षाच्या अवलियाने 32 वर्षांच्या कार्लसनला दिलेल्या जबरदस्त आव्हानामुळे जगभरातून प्रज्ञानंदचं कौतुक होत आहे.त्याने याआधी कार्लसनचा पराभव केला आहे, पण अंतिम सामन्यात हा करिष्मा पुन्हा करता आला नाही.
आनंद महिंद्रा यांनी प्रज्ञानंदच्या पालकांना ही भेट दिली आहे कारण व्हिडिओ गेमच्या युगात त्यांनी आपल्या मुलाला बुद्धिबळाच्या खेळात करिअर करण्याची प्रेरणा दिली.
याची सुरूवात तेव्हा झाली जेव्हा अनेक लोकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर (पूर्वीचे ट्विटर) आनंद महिंद्रा यांना प्रज्ञानंद याला एक थार भेट देण्याची विनंती केली.उत्तरात आनंद महिंद्रा यांनी लिहिले, “मी तुमच्या भावनेची कदर करतो, तुमच्यासारखे अनेक लोक मला प्रज्ञानंदला थार भेट देण्याचा आग्रह करत आहेत. पण माझ्याकडे वेगळीच कल्पना आहे. मी सर्व पालकांना यासाठी प्रोत्साहित करू इच्छितो की, त्यांनी त्यांच्या मुलांना व्हिजीओ गेम खेळण्याऐवजी बुद्धिबळ आणि यासारखे विविध खेळ खेळण्यासाठी प्रेरित करावं. ही ईव्ही प्रमाणेच तुमच्या मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी केलेली गुंतवणूक असेल. आणि म्हणूनच मला वाटतं की, प्रज्ञानंदचे पालक श्री रमेशबाबू आणि श्रीमती नागलक्ष्मी यांना मी XUV4OO EV कार भेट देऊ इच्छितो.आपल्या मुलाची आवड जोपासल्याबद्दल आणि त्याला अथक पाठिंबा दिल्याबद्दल ते आमच्या कृतज्ञतेला पात्र आहेत.”
आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटमध्ये महिंद्र अँड महिंद्राचे कार्यकारी संचालक आणि सीईओ राजेश जेजुरीकर यांना टॅग केले आणि त्यांना यावर त्यांचे मत मांडण्यास सांगितले आहे. यावर जेजुरीकरांनी लिहिले की, “अद्भुत कामगिरीबद्दल प्रज्ञानंदचं अभिनंदन!
प्रत्युत्तरात रिजेश जेजुरीकर यांनी लिहिले, “प्रज्ञानानंद तुमच्या अद्भूत कामगिरीबद्दल अभिनंदन. तसेच प्रज्ञानानंद याचे आई-वडील नागलक्ष्मी आणि रमेशबाबू यांच्याबदल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या कल्पनेबद्दल आनंद महिंद्रा यांचे आभार. इलेक्ट्रिक SUV XUV400 ही उत्तम भेट असेल. आमची टीम या कारच्या वितरणासाठी लवकरच त्यांच्याशी संपर्क साधेल.
प्रज्ञानंद यांने या खास भेटीसाठी आनंद महिंद्रा आणि राजेश जेजुरीकर यांचे आभार मानले आहेत. प्रज्ञानंद यानं राजेश जेजुरीकर यांच्या पोस्टला उत्तर देत म्हटलं आहे की, “माझ्याकडे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत. आनंद महिंद्रा सर आणि राजेश जेजुरीकर तुमचे खूप खूप आभार. ईव्ही कार खरेदी करणे हे माझ्या पालकांचे जुने स्वप्न आहे, ते प्रत्यक्षात आणल्याबद्दल.” धन्यवाद! ”
उत्तरात आनंद महिंद्रा यांनी लिहिले आहे की, “कार निर्मात्याचे अंतिम ध्येय स्वप्नांना सत्यात बदलणे आहे.”