ऑलिम्पिक दिनी होणार ऑनलाइन वर्कशॉप
नवी दिल्ली – भारताची ऑलिम्पिक पदकविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि ऑलिम्पिकला पात्र ठरलेली कुस्तीपटू विनेश फोगट येत्या मंगळवारी ऑलिम्पिक दिनी होत असलेल्या ऑनलाइन वर्कशॉपमध्ये सहभागी होमार आहेत.
क्रीडाविषयक चर्चा, सराव तसेच विविध घटकांत होत असलेल्या वर्कशॉपमध्ये या दोन खेळाडूंसह अनेक नामवंत खेळाडू तसेच प्रशिक्षक व विविध खेळांतील जाणकारही सहभागी होणार आहेत. जगभरात 23 जून हा दिवस ऑलिम्पिक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त अनेक कार्यक्रम तसेच क्रीडा स्पर्धादेखील घेण्यात येतात. मात्र, यंदा करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने तसेच देशात लॉकडाऊनही असल्याने या खेळाडूंना प्रत्यक्ष मैदानावर तसेच क्रीडा संकुलात कार्यक्रम व स्पर्धा आयोजित करणे शक्य होणार नसल्याने या वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे.