भवानीनगर – विद्यार्थ्यांना जीवनामध्ये संघर्ष करत असताना त्यांना चांगल्या प्रकारे ऊर्जा मिळावी, त्यांचे शरीर सुदृढ आणि निरोगी राहावे यासाठी योग्य शिक्षण हेच महत्त्वाचे माध्यम असल्याचे मत कैवल्यधाम आउटरिच टिमच्या अंजली देशमुख यांनी मत व्यक्त केले.
माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, कैवल्यधाम आऊटरिच टीम पुणे आणि श्री छत्रपती हायस्कूल काटेवाडी यांच्या वतीने श्री छत्रपती हायस्कूल काटेवाडी शाळेच्या आवारात योग शिबिराचे आयोजन केले होते.
त्यावेळी त्या बोलत होत्या. शिबिराचे आयोजन पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष जितेंद्र काटे यांनी केले होते. यावेळी तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष राजेंद्र पवार, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राहुल वाबळे, सरचिटणीस अविनाश काळकुटे, युवराज काटे, विश्वास धायगुडे आदी उपस्थित होते.
कैवल्यधाम आऊटरिच टीममधील अंजली देशमुख, योगेश वैद्य, स्वाती घुले, सुषमा वाकडे, वसुधा जोशी, रूची अग्रवाल, तेजस्विनी, रसिका, रूपाली गोखले, सोनाली कोलते यांनी योगासनाचे विविध प्रकार, प्रात्यक्षिक करून दाखविले. जितेंद्र काटे यांनी आभार मानले.