पुणे -उन्हाळी सुटीनंतर शाळा होण्यास आता अवघा आठवडा उरला आहे. तर, आप्पा बळवंत चौकासह उपनगरांतही शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे दुकानांत दिसत आहे. यंदा काही शाळांनी शुल्क वाढवले असताना, शैक्षणिक साहित्यांच्या किंमतीत सरासरी 15 ते 20 टक्के भाववाढ दिसून येत आहे.
यावर्षी नववी, दहावीची पुस्तके, वह्या, बॅग, कंपास पेटी, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली यांच्या दरांमध्ये वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. करोनापूर्वी दर स्थिर होते. मात्र, करोनानंतर कच्चा मालाचे दर आणि इंधन दरवाढीमुळे ही महागाई वाढली आहे. गेल्यावर्षीनंतर यंदादेखील महागाई वाढली आहे.
नववी व दहावीसाठी लागणाऱ्या दोन्ही पुस्तकांचा विषयनिहाय संच उपलब्ध आहे. नववीचा संच हा गतवर्षी 419 रुपयांना मिळायचा. यात 8 पुस्तके असतात. तो आता 523 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. दहावीच्या पुस्तकांचा संच हा 575 रुपयांवरुन 665 रुपये इतका झाला. त्यात 9 पुस्तके असतात.
वह्या महागल्या
100 पानांची वही 25 रुपये, 200 पानांच्या वहीची किंमत 35 रुपये आहे. यात प्रति वही कंपनीनुसार 5 ते 7 रुपये दरवाढ झाली आहे. 100 पानांची (लॉंग बुक) 40 रुपये, तर 200 पानांची 80 रुपयांना मिळत आहे. प्रत्येक लॉंग बुकमागे 10 ते 15 रुपये यंदा वाढले आहेत.
अशा आहेत किमती…