मुंबई – मुंबई – दोन दिवसांपूर्वी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) बुरखेधारी हल्लेखोरांकडून विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली होती. या घटने नंतर चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांनी निषेध नोंदवला आहे.
I have always maintained that we should wait for proper facts to emerge.
I appeal to everyone- let us further the spirit of peace and brotherhood, not derail it either consciously or carelessly #JNUViolence
— Ajay Devgn (@ajaydevgn) January 10, 2020
दरम्यान, या सर्व कलाकारानं नंतर बॉलिवूडचा सिंघम म्हणजेच अभिनेता ‘अजय देवगण’ याने देखील आपले मांडलं आहे. अजय म्हणाला कि, “जेएनयूमध्ये जो प्रकार घडला तो दुर्दैवी आहे… तसेच अद्यापही कोणी काय केलं याबाबतची स्पष्ट माहिती आपल्याला मिळू शकलेली नाही…. त्यामुळे योग्य माहिती नसेल तर आगीत तेल ओतण्याचं काम करु नका.. असा सल्ला त्यानं दिला आहे.
तसेच, एक कलाकार म्हणून आपल्यावर काही जबाबदारी असते. त्यात काही वक्तव्य करुन गोंधळ निर्माण करण्याची माझी इच्छा नाही. एका कलाकाराने पूर्ण माहिती घेऊनच भाष्य करावं, असं सुद्धा अजय म्हणाला आहे.