पुणे – दुधाच्या दरात वाढ झाल्यामुळे पुन्हा एकदा ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कल्याणकारी दूध संघाने गायी-म्हशीच्या दुधाच्या किंमतीत प्रति लिटर २ रुपयांनी वाढ केली आहे.
दुधाच्या किंमतीबाबद काल (दि. १०) राज्यातील कल्याणकारी दूध संघांची पुण्यात महत्वाची बैठक पार पडली यावेळी हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे संपूर्ण राज्यात आज मध्यरात्रीपासून दूध २ रुपयांनी महागणार आहे.
दरम्यान, आधीच्या किंमती पेक्षा गायीच्या प्रतिलिटरला आता ४६ वरून ४८ रुपये तर , म्हशीच्या दुधाला ५६ ऐवजी ५८ रुपये दर आकारला जाणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सामान्य नागरिकांना दुधाच्या वाढत्या दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे.
दरम्यान, काल पारपडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत राज्य कल्याणकारी दूध संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के, सचिव प्रकाश कुतवळ, खजिनदार डॉ. विवेक क्षीरसागर तसेच संघाचे 52 सदस्य तसेच दूध संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.