‘कोण कोणास म्हणाले – व्यवहार माझे, जबाबदार वाझे! सांगा पाहू…’

अमृता फडणवीस यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

मुंबई – सचिन वाझे प्रकरणात एनआयएकडून तपास मोहीम वेगाने सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणात एनआयएने आणखी एक मर्सिडीज जप्त केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 5 वाहने जप्त करण्यात आली आहेत. आता एनआयएच्या अधिकाऱ्यांकडून या वाहनाची तपासणी सुरु आहे. त्यामुळे यातून आता नेमक कोणते गूढ उकलते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.   येत्या काळात या तपासामुळे  राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाची अडचण झाल्याचं बोललं जात आहे. यावरून विरोधीपक्ष  जोरकसपणे ठाकरे सरकारला घेरलं आहे.


आता भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस  यांनीही ट्विट करत ठाकरे सरकावर हल्लाबोल केला आहे.

काय आहे अमृता फडणवीस यांचं ट्विट  

‘कोण कोणास म्हणाले – व्यवहार माझे, जबाबदार वाझे! सांगा पाहू…’, असं ट्वीट करत अमृता फडणवीस यांनी तिरकसपणे राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.