मुंबई – माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी बँकर असल्या तरी त्या गायिका म्हणून आता संपूर्ण महाराष्ट्राला परिचीत आहेत. राजकीय विषयांवर टीप्पणी कऱणाऱ्या अमृता फडणवीस सोशल मीडियावर गायणामुळे सतत चर्चेत असतात. जागतिक महिला दिनानिमित्त अमृता यांनी आपलं नव गाणं सादर केलं होतं. त्यांच्या या गाण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त दिली होती. त्या प्रतिक्रियेला आज अमृता यांनी रिप्लाय दिला आहे. धन्यवाद रोहित भाऊ, असे म्हणत अमृता फडणवीसांनी रोहित पवारांचे आभार मानले.
तत्पूर्वी रोहित पवार यांनी ट्विट केले होतं की,’काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही, पण अमृता फडणवीस ताई मिळालेल्या संधीचा आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा!’ असं म्हणत त्यांनी शुभेच्छा दिल्या आहे.
अमृता फडणवीस यांचं नुकतच सादर झालेलं ‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…हे नाट्य संगीतावर आधारित गीत पसंतीस उतरत आहे. या गाण्यासाठी ट्विटरवर २४ हजारहून अधिक व्ह्यूव मिळाले आहेत.