मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर रोज नवनवीन खुलासे ,दावे-प्रतिदावे सत्ताधारी आणि विरोधकांकडून करण्यात येत आहेत. त्यातच आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मोठा दावा केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा हात होता असा आरोप केसरकर यांनी केला आहे. एवढंच नाही तर नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी शरद पवारांनीच मदत केली होती असा दावाही केसरकरांनी केला आहे. या टीकेवर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केसरकरांना प्रतिउत्तर देण्यात येत आहे.
राष्ट्रवादी नेता अमोल मिटकरींनी खोचक ट्वीट करत दीपक केसरकरांना टोला लगावला आहे. ‘केसरकर साहेब सद्या तुम्ही हवेत आहात. पवार साहेबांवर बोलल्याने प्रसिध्दी मिळते हे तुम्ही जाणुन आहात.तुमची अजितदादांसमोर असणारी केविलवाणी अवस्था मी अनेकदा पहिली आहे. उगाच आम्हाला तोंड उघडायला लाऊ नका. हवेतून खाली या. तसेही तुमची बडबड जास्त दिवस चालणार नाही.’ असही ते म्हणाले.
केसरकर साहेब सद्या तुम्ही हवेत आहात. पवार साहेबांवर बोलल्याने प्रसिध्दी मिळते हे तुम्ही जाणुन आहात.तुमची अजितदादांसमोर असणारी केविलवाणी अवस्था मी अनेकदा पहिली आहे. उगाच आम्हाला तोंड उघडायला लाऊ नका. हवेतून खाली या. तसेही तुमची बडबड जास्त दिवस चालणार नाही.
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 13, 2022