Shweta Nanda – बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांची मुलगी श्वेता नंदा हिला लहानपणापासूनच ग्लॅमरच्या जगापासून दूर ठेवले. श्वेता नंदा देखील ग्लॅमरच्या जगापासून अंतर राखते. श्वेता सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहते. ती अनेकदा तिच्या कुटुंबासोबतचे फोटोही शेअर करत असते. दरम्यान, अमिताभ – जया यांच्या लाडक्या मुलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. पण यूजर्स या व्हिडिओची खिल्लीही उडवत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये श्वेता नंदा रॅम्प वॉक करताना दिसत आहे. हा व्हिडिओ खूप जुना असला तरी. श्वेताची अशी स्टाईल क्वचितच पाहायला मिळते. व्हिडिओमध्ये श्वेता नंदा पांढऱ्या रंगाचा फेदर आउटफिट घालून फिरताना दिसत आहे. स्वेता रॅम्प रॅम्प वॉक करतेवेळी अभिनय करताना तर कधी हवेत हात फिरवताना दिसते.
सोशल मीडिया यूजर्सना श्वेता नंदाची ही स्टाइल खूपच विचित्र वाटत आहे. हा व्हिडिओ 2016 चा आहे. अमिताभ बच्चन यांच्या मुलीने डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांच्यासाठी हा रॅम्प वॉक केला. श्वेता जानी आणि खोसला यांच्या आंतरराष्ट्रीय फॅशन लाइन, Volvo S90 च्या कार्यक्रमाची शोस्टॉपर बनली. रॅम्प वॉक दरम्यान सर्वांच्या नजरा श्वेतावर खिळल्या होत्या.