Kareena Kapoor Ambassador In UNICEF India| बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. नुकतीच करिना ‘क्रू’ चित्रपटात पाहायला मिळाली. या चित्रपटात करीनाशिवाय तब्बू आणि क्रिती सेननही मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या. यातील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले. यानंतर आता करीनाकडे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. ती आता युनिसेफची नॅशनल ॲम्बेसिडर झाली आहे.
करीना कपूर खानला 4 मे रोजी युनिसेफने नॅशनल ॲम्बेसिडर म्हणून घोषित केले आहे. खुद्द करीना कपूरने ही माहिती तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. इनस्टाग्रामवर तिने काही फोटो शेअर केले आहेत. सोबतच तिने “माझ्यासाठी आजचा दिवस फारच इमोशनल राहिला आहे. मला UNICEF India ची नॅशनल ॲम्बेसिडर म्हणून नियुक्त केल्याबद्दल खूप चांगले वाटत आहे. गेल्या 10 वर्षांपासून मी युनिसेफसोबत काम करते. त्यांच्यासोबत काम करताना मला खूप चांगले वाटले.”
View this post on Instagram
“भविष्यातही ती या संस्थेशी पूर्ण प्रामाणिकपणे जोडली जाईल. आम्ही आतापर्यंत जे काही काम केले आहे त्याचा मला अभिमान आहे. मी अजूनही मुलांच्या हक्कांसाठी वचनबद्ध आहे आणि भविष्यातही त्यांच्यासाठी काम करत राहीन. याशिवाय मी माझ्या संपूर्ण टीमचे आभार मानू इच्छितो. तुम्ही लोक महिला आणि मुलांच्या हक्कांसाठी अथक प्रयत्न करत आहात,” असे तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. Kareena Kapoor Ambassador In UNICEF India|
UNICEF म्हणजेच The United Nations International Childrens Emergency Fund ही संस्था जगभरातील मुलांचे आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करते. तसेच त्यांचा संपूर्ण विकास करणे हे या संस्थेचं उद्दिष्ट आहे. दरम्यान, करीना कपूर ‘क्रू’ चित्रपटानंतर ‘सिंघम अगेन’ मध्येही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. Kareena Kapoor Ambassador In UNICEF India|
हेही वाचा:
बारामतीत प्रचाराच्या तोफा आज थंडावणार; शरद पवार यांच्या सांगता सभेचं पहिल्यांदाच मैदान बदललं…