‘धूम’ या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शक संजय गढवी यांचे निधन झाले. आज 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लोखंडवाला बॅकरोडमध्ये संजय गढवी मॉर्निंग वॉक करत असताना त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर त्यांना घाम आला.
त्यांना तातडीने जवळच्या सर्वात मोठ्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. संजय गढवी यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण बॉलिवूडचे मोठे नुकसान झाले आहे.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, मॉर्निंग वॉक दरम्यान संजयला हृदयविकाराचा झटका आला. सध्या संजय यांचे पार्थिव कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात आहे. १९ नोव्हेंबरला सायंकाळी उशिरा संजय गढवी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
संजय गढवी यांची मोठी मुलगी संजना हिने वृत्तमाध्यमांना सांगितले की, १९ नोव्हेंबरला सकाळी त्यांचे निधन झाले. कोणतीही समस्या नव्हती आणि सर्व काही ठीक होते.
संजयने यशराज फिल्म्सच्या सहकार्याने जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि हृतिक रोशन अभिनीत ‘धूम’ आणि ‘धूम 2’ चे दिग्दर्शन केले होते. संजय यांनी मेरे यार की शादी है, तेरे लिए, किडनॅप, अजब गजब लव्ह आणि ऑपरेशन परिंडे यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शनही केले होते. 2004 मध्ये सुरू झालेली ‘धूम’ फ्रेंचायझी देशातील सर्वात मोठी फिल्म फ्रँचायझी आहे. त्याचे पहिले दोन चित्रपट संजय गढवी यांनी दिग्दर्शित केले होते. तिसरा चित्रपट ‘धूम 3’ विजय कृष्ण आचार्य यांनी दिग्दर्शित केला होता.