महाराष्ट्रच्या सत्तासंघर्षात अखेर अमित शहांची एन्ट्री

मुंबई – काही दिवसांपासून सुरु असलेल्या महाराष्ट्रच्या सत्तासंघर्षात अखेर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष ‘अमित शहा’ यांनी आज एन्ट्री घेतली आहे. भाजपाच्या दिवसभरातील दुसऱ्या बैठकीला अमित शहा थेट दिल्लीतून मार्गदर्शन करत आहेत अशी माहहती समोर आली आहे.

भाजपच्या कोअर कमिटीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन करत असून या बैठकीत मुख्यमंत्रिपदाच्या पालखीत शिवसैनिकालाच बसवणार का? यावर अंतिम निर्णय होणार आहे. गेल्या ५० मिनिटांपासून भाजप कोअर कमिटीची बैठक सुरु आहे.

या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, गिरीश महाजन आणि भाजपचे इतर नेते उपस्थित आहेत. महाराष्ट्र भाजपने राज्याच्या सत्तेचा तिढा सोडवण्याचे सर्व अधिकार अमित शहा यांना दिले असल्याचे दिसून येते आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.