राहुल यांच्या बालेकिल्ल्यात अमित शहांचा रोड शो

अमेठी – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा बालेकिल्ला असणाऱ्या उत्तरप्रदेशातील अमेठी मतदारसंघात शनिवारी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा रोड शो झाला. त्यावेळी त्यांच्या समवेत भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी याही होत्या.

रोड शोवेळी पत्रकारांशी बोलताना शहांनी घराणेशाहीवरून कॉंग्रेसला लक्ष्य केले. उत्तरप्रदेशात मतदारांना घराणेशाही आणि विकास या दोहोंपैकी एकाची निवड करायची आहे. मतदार विकासालाच पसंती देतील. उत्तरप्रदेशात भाजपच्या जागा वाढतील. अमेठीत आमचा एक लाख मताधिक्‍याने विजय होईल, असा दावा त्यांनी केला. तर, अमेठीमधील जनतेला बदल हवाय. जनतेला विकास हवा असल्याने मतदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी मतदान करतील, असे स्मृती यांनी म्हटले. मागील निवडणुकीत भाजपने उत्तरप्रदेशातील लोकसभेच्या 80 पैकी तब्बल 71 जागा जिंकल्या होत्या. त्या निवडणुकीत स्मृती यांना लाखभरापेक्षा अधिक मताधिक्‍याने राहुल यांनी पराभूत केले. मात्र, राहुल यांचे मताधिक्‍य मोठ्या प्रमाणात घटले. राहुल यांनी 2009 च्या निवडणुकीत 3 लाखांपेक्षा अधिक मताधिक्‍याने विजय मिळवला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.