Amit Shah On CAA। केंद्रीय गृहमंत्री माहित शाह यांनी आज मोठी घोषणा केली आहे. त्यांनी देशात लोकसभा निवडणुकीपूर्वी समान नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू होणार असल्याचे म्हटले. निवडणुकीपूर्वी याची अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याचे शाह यांनी सांगितले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पश्चिम बंगालच्या दौऱ्यावेळी त्यांनी “CAA ची अंमलबजावणी कोणीही रोखू शकत नाही” असे म्हटले होते.
अमित शाह यांनी CAA विषयी बोलताना,”मला हे स्पष्ट करायचे आहे की CAA कोणत्याही व्यक्तीचे नागरिकत्व काढून घेणार नाही. त्याचा उद्देश केवळ धार्मिक छळाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानी, अफगाण आणि बांगलादेशी अल्पसंख्याकांना नागरिकत्व देणे आहे.” असे म्हटले.
हेही वाचा
अमित शाह यांनी स्पष्टच सांगितले,’लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या विरोधात ‘कोण’ ?’
अमित शाह यावेळी काँग्रेसने शेजारील देशातील अत्याचारित अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याचे आश्वासन दिले होते. “जेव्हा देशाची फाळणी झाली, तेव्हा काँग्रेसने त्यानं तुम्ही इथे या, तुम्हाला इथले नागरिकत्व दिले जाईल.” असे म्हटले होते.
विरोधकांकडून मुस्लिम समाजाची दिशाभूल Amit Shah On CAA।
केंद्रीय गृहमंत्र्यांनी विरोधकांवर मुस्लिमांची दिशाभूल केल्याचा आरोप केला. “सीएएबद्दल आमच्या मुस्लिम बांधवांची दिशाभूल केली जातीय. सीएए केवळ पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील धार्मिक अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्यासाठी आहे.
नरेंद्र मोदी सरकारने लागू केलेल्या सीएएचे उद्दिष्ट 31 डिसेंबर 2014 पूर्वी बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चनांसह छळ झालेल्या गैर-मुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व प्रदान करणे आहे.
‘ही निवडणूक विकास विरुद्ध भ्रष्टाचार’ Amit Shah On CAA।
आगामी लोकसभा निवडणुकीबाबत अमित शाह यांनी, ही निवडणूक विकास विरुद्ध भ्रष्टाचाराची आहे. “ही निवडणूक I.N.D.I.A विरुद्ध NDA बद्दल नाही. ही निवडणूक ज्यांना राष्ट्रीय सुरक्षा मिळवायचीय विरुद्ध जे परराष्ट्र धोरणाच्या नावाखाली राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणतात त्यांच्याबद्दल आहे, असे त्यांनी म्हटले
हेही वाचा
मोदी सरकारच्या 9 वर्षात काश्मीरमध्ये दहशतवाद किती कमी झाला? अमित शाह यांनी सांगितले ‘आकडे’