Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला 370 जागा मिळतील आणि एनडीएला त्याहून अधिक 400 जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. अशात येत्या निवडणुकीत भाजप पक्ष बहुमताने जिकेलं असा विश्वासही भाजप पक्षातील नेत्याकडून व्यक्त केला जात आहे. अशात नुकतेच गृहमंत्री अमित शाह यांनी लोकमत या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत यंदाच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या विरोधात ‘कोण’ असणार या प्रश्नावर आपलं मत व्यक्त केलं आहे.
गृहमंत्री अमित शाह यांना वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या विरोधात ‘कोण असणार असा प्रश्न विचारण्यात आला यावर अमित शाह म्हणाले, ‘ही संपूर्ण निवडणूक नरेंद्र मोदींविरोधात ‘कोण’ अशी आहे. महाराष्ट्रात शरद पवार असतील किंवा अन्य कोणी असेल, हे येणारा काळच सांगेल.’ असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली
त्यांना पुढे विचारण्यात आले की कलंकित नेते सरकारमध्ये सामील झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या नकारात्मक वातावरणाचा भाजपच्या निकालावर काही परिणाम होईल असे वाटत नाही का ? यावर ते म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत बोलायचे झाले, तर ही निवडणूक केंद्राची निवडणूक आहे. इथे केंद्राच्या मुद्यांचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होईल. महाराष्ट्राचा केंद्रावर परिणाम होणार नाही.’ असं म्हणत त्यांनी येत्या निवडणुकात भाजप जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.