Amit Shah : गुजरातमधील अहमदाबाद शहरात स्वामीनारायण गुरुकुल विश्वविद्या प्रतिष्ठान (SGVP) तर्फे आयोजित पूज्य पुराणिक स्वामी स्मृती महोत्सवात सहभागी होण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी येत्या २२ जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घटनाविषयी माहिती दिली.त्यासोबतच त्यांनी भारतीय सैन्याच्या साहसाचे कौतुक देखील केले.
पूज्य पुराणिक स्वामी स्मृती महोत्सवात उपस्थिनांना संबोधित करताना अमित शाह यांनी,दरम्यान, भारतीय लष्कराचे कौतुक करताना पाकिस्तानचे नाव न घेता अमित शाह यांनी, शेजाऱ्यांशी संबंध चांगले असले पाहिजेत. पण देशाच्या सीमेसोबत छेडछाड करण्याचा अधिकार कोणालाही नाही. असे त्यांनी खडसावून सांगितले. बालाकोट एअर स्ट्राईक आणि उरी सर्जिकल स्ट्राईकचा संदर्भ देत गृहमंत्री म्हणाले की, भारतीय लष्कर आता घरांमध्ये घुसून प्रत्युत्तर देते. ते म्हणाले की, लष्कर आता दहशतवादाला उत्तर देते. पंतप्रधान मोदींच्या सरकारनेच पाकिस्तानवर हवाई हल्ला केला होता.
पुढे त्यांनी ‘जर स्वामी नारायण संप्रदायाच्या गुरुकुलांनी गुजरातमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम केले नसते तर गुजरातचे सर्व शिक्षा अभियान अपूर्ण राहिले असते.’असे म्हटले. त्यासोबतच त्यांनी राम मंदिर, दहशतवाद, भारतीय लष्कराचे शौर्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल सांगितले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
जनतेला संबोधित करताना अमित शाह म्हणाले की, राम मंदिराचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे आणि पुढे ढकलले जात आहे. प्रभू राम जन्मभूमीला नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.पंरतु, आता रामलला 22 जानेवारीपासून त्यांच्या घरी राहणार आहेत. “पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारीला अयोध्येला जातील आणि संतांच्या उपस्थितीत राम लल्लाला अभिषेक करतील” असे त्यांनी यावेळी म्हटले. पीएम मोदींसह भाजपचे जवळपास सर्व प्रमुख नेते प्राणप्रतिष्ठेसाठी २२ जानेवारीला अयोध्येत पोहोचणार आहेत.
त्यासोबतच अमित शाह म्हणाले यांनी, 2014 पूर्वी देशाच्या सीमा सुरक्षित नव्हत्या. तरुण आणि महिला निराश- हतबल राहत होते. गुजरातचे मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान झाल्यावर देशाचे चित्र बदलले. , कोरोनाच्या काळात सरकारने चांगले काम केले आहे. देशात कोरोनाची लस तयार झाली आणि सरकारने भारतातील प्रत्येक भागातून लोकांना लस दिली. 2024 मध्ये नरेंद्र मोदींना पंतप्रधान करा,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.