वॉशिंग्टन – जगातील पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेला एका वेगळ्या सामाजिक समस्येचा सामना करावा लागत आहे अमेरिकेची लोकसंख्या आता म्हातारी होत असून आगामी कालावधीमध्ये याचा परिणाम अर्थव्यवस्थेच्या विकासावर होण्याची भीती व्यक्त होत आहे गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेत सातत्याने जन्मदर घटत चालल्याने त्याचा परिणाम लोकसंख्येच्या गुणवत्तेवर झाला आहे अमेरिकन लोकसंख्येचे सरासरी वय मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
1980 च्या दशकात अमेरिकन लोकसंख्येचे सरासरी वय हे 30 होते पण आता नव्या आकडेवारी प्रमाणे हे सरासरी वय 40 पर्यंत येऊन पोहोचले आहे म्हणजेच अमेरिकेत 40 च्या आसपास वय असणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने अमेरिकेच्या जन्मदरात घट होत आहे महिलांनी शिक्षणाला प्राधान्य दिल्याने आणि लग्नानंतर सुद्धा मुलाला जन्म देण्यास जोडपी विलंब करत असल्याने त्याचा फटका अमेरिकेच्या सामाजिक व्यवस्थेला बसत आहे.
तरुण लोकसंख्येत घट होत असल्याने आगामी कालावधीमध्ये उत्पादन व्यवस्थेवरही त्याचा परिणाम होणार असून त्याचा थेट फटका अर्थव्यवस्थेच्या विकासालाही बसणार आहे सोशल एक्सप्लोरर नावाच्या एका आघाडीच्या संस्थेने संशोधन केल्यानंतर ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे या संस्थेचे संचालक अंद्री बेवरेज यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे करोना महामारीच्या कालावधीत अमेरिकेतील जन्मदरात अधिकच घट झाली आहे नॉर्वे आणि स्वीडन या देशांमध्ये सुद्धा हीच समस्या जाणवू लागली आहे वयाच्या विशीनंतर अनेक महिला शिक्षणाला आणि नोकरीला प्राधान्य देत असल्याने त्यांचे विवाहाचे वयही लांबत चालले आहे.
त्यानंतर अनेक वेळा जोडपी लवकर मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेत नाहीत त्याचाच परिणाम होऊन जन्मदर घटत चालला आहे केवळ अमेरीकेचा विचार करता जगाच्या कानाकोपऱ्यातील युवक शिक्षणाच्या किंवा नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत स्थायिक होत असल्याने त्याचा हातभार काही प्रमाणात अमेरिकेला लागला आहे युवक मोठ्या प्रमाणावर अमेरिकेत येत असल्याने काही प्रमाणात अमेरिकन लोकसंख्येची गुणवत्ता सुधारली आहे.