Divya Agarwal : ‘बिग बॉस ओटीटी’ फेम दिव्या अग्रवाल विवाहबंधनात अडकली आहे. बिझनेसमॅन अपूर्व पाडगावकरसोबत तिने लग्नगाठ बांधली आहे. हा विवाह सोहळा अतिशय साधेपणाने पार पाडला. लग्नाला फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. लग्नाचे फोटो दिव्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
दिव्या आणि अपूर्वाने त्यांच्या लग्नसोहळ्यात मॅचिंग कलरचे आउटफिट्स परिधान केले होते. जांभळ्या रंगाच्या लेहेंग्यात दिव्या खूपच सुंदर दिसत होती तर अपूर्वनं जांभळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. या फोटोला दिव्याने ‘या क्षणापासूनच आमची प्रेमकथा सुरु होत आहे… रब रखा,’ असे कॅप्शन दिले होते. तिचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून सेलिब्रिटींसह चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. प्रिंस नरूना, नायरा बनर्जी, अशनूर कौर, मनु पंजाबी आणि अर्चना गौतम यांनी दिव्याच्या फोटोला कमेंट करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
दिव्याचे कोणासोबत जोडले नाव?
दिव्या याआधी वरुण सूदसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते. ते दोन वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्येही होते आणि नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. ब्रेकअपच्या आठ महिन्यांनंतर दिव्याने बिझनेसमन अपूर्वसोबत एंगेजमेंट करून सर्वांना आश्चर्यचकित केले. ‘स्प्लिट्सविला’ दरम्यान तिचे प्रियांक शर्मासोबत अफेअरही होते. यामुळे ती चर्चेत आली होती.
दरम्यान, दिव्याने अनेक रिॲलिटी शो केले आहेत. ती ‘बिग बॉस ओटीटी’ या कार्यक्रमाची विजेती ठरली. तिने ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’, ‘कार्टेल’ आणि ‘अभय’ या वेब सीरिजमध्ये काम केले.