पुणे – महापारेषण कंपनीच्या यवत अतिउच्चदाब उपकेंद्रातील 25 एमव्हीएच्या जागी 50 एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार आहे. हे काम दि. 2 ते 13 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत उरुळी कांचनसह 4 गावांना पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा करण्यात येणार आहे. मात्र, ऐनवेळी भार व्यवस्थापन शक्य न झाल्यास चक्राकार पद्धतीने विजेचे भारनियमन करावे लागण्याची शक्यता आहे.
यवत अतिउच्चदाब उपकेंद्रातून महावितरणच्या कोरेगाव (मूळ) 33/11 केव्ही उपकेंद्राला वीजपुरवठा होतो व या उपकेंद्रातून चार वीजवाहिन्यांद्वारे उरूळी कांचन, अष्टापूर, हिंगणगाव, खामगाव टेक, टिळेकरवाडी या गावांतील 15 हजार 700 ग्राहकांसह 1,200 कृषिपंपांना वीजपुरवठा करण्यात येतो. मात्रया कामामुळे तीन मेगावॅट विजेची तूट निर्माण होणार आहे.