मुंबई : येणारी विधानसभा भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्षांसह महायुती करून लढवली जाईल. याची अधिकृत घोषणा लवकरात लवकरच करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिली. त्याचबरोबर जागावाटपही पूर्ण झाल्याचा दावा त्यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन त्याची घोषणा करतील. संजय राऊत यांची विधाने त्यांच्या पक्षासाठी योग्य आहेत. ते जिवंतपणाचे लक्षण आहे, असे त्यांनी सांगितले.