सातारा – कोरेगाव मतदार संघातील भाजपचे नेते आणि विधानसभेचे इच्छुक उमेदवार महेश शिंदे यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केला. कोरेगाव मतदार संघातून निवडणुक लढण्यासाठी शिंदे यांनी भाजपकडे फिल्डिंग लावली होती. मात्र, युतीच्या जागा वाटपात हा मतदार संघ शिवसेनेकडे आल्याने महेश शिंदे यांनी मातोश्रीवर जात सोमवारी उध्दव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून घेतले.
यावेळी शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे- पाटील, माजी आमदार दगडुदादा सपकाळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.