पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून चंद्राकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, पाटील यांच्या या निवडीला भाजप मधूनच विरोध सुरू झाला असून ” दूरचा नको घरचा पाहिजे; आमचा आमदार कोथरूडचा पाहिजे’ – आम्ही कोथरूडकर असे पोस्टर कोथरूड मतदारसंघात झळकविण्यात आले आहेत.
महर्षी कर्वेंच्या पुतळयाच्या रेलिंगवरच हे पोस्टर लावण्यात आला असून मतदारसंघात याचीच चर्चा आहे. दरम्यान, पाटील यांच्या निवडीला अखील भारतीय ब्राम्हण महासंघानेही विरोध केला असून ब्राह्मण समाजाला विरोध करणाऱ्या उमेदवाराच्या विरोधात गरज पडल्यास ब्राह्मण महासंघाकडून उमेदवार उभा करण्याचा इशारा महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी दिला आहे