पिंपरी – भोसरी विधानसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे हे प्रत्येक फेरीनिहाय आघाडीवर असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी बालेवाडी क्रीडा संकुलाबाहेर भंडारा उधळण एकच जल्लोष सुरू केला आहे. निकाल हाती येण्याआधीच कार्यकर्त्यांमध्ये विजयाची आशा निर्माण झाली आहे.