पुणे : गेल्या विधानसभेला आठही मतदारसंघात विजय मिळवत पुण्यावर भाजपाने पूर्ण वर्चस्व निर्माण केले होते. मात्र, यावेळी दोन मतदारसंघात राष्ट्रवादी तर एका मतदारसंघात कॉंग्रेस आघाडीवर असल्याचे चित्र आहे. मात्र, महापौर मुक्ता टिळक आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विजयाकडे वाटचाल सुरू ठेवून आपल्या प्रतिष्ठेच्या जागा कायम ठेवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.
कसवा मतदार संघात मुक्ता टिळक या निकटचे प्ररिस्पर्धी अरविंद शिंदे यांच्यापेक्षा सुमारे 25 हजार मतांनी आघाडीवर आहेत. खडकवासल्यात जोरदार चुरस पहायला मिळत असून राष्ट्रवादीचे सचिन दोडके भाजपाच्या चंद्रकांत तापकीर यांच्यापेक्षा तीन मतांनी आघाडीवर आहेत. वडगाव शेरी मतदार संघात भाजपाचे जगदिश मुळीक हे राष्ट्रवादीच्या सुनिल टिंगरे यांच्यापेक्षा 15 हजार मतांनी आघाडीवर आहेत.
शिवाजीनगरमध्ये भाजपाचे सिध्दार्थ शिरोळे हे कॉंग्रेसच्या दत्ता बहिरट यांच्यापेक्षा चार हजार मतांनी आघडीवर आहेत. पुणे कॅंटोन्मेंटमध्ये रमेश बागवे हे अवघ्या 170 मतांनी आघाडीवर आहेत.हडपसरमध्ये चेतन तुपे हे भाजपाच्या विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांच्यापेक्षा तीन हजारांनी पिछाडीवर आहेत.