#Live# हरियाणा : बबिता फोगट दादरी मतदार संघातून आघाडीवर

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि हरियाणा विधानसभा निवडणूक यांचे निकाल आज लागणार आहेत. हरियाणामध्ये पुन्हा एकदा भाजपाचे सरकार येणार का? नेमकं काय घडणार याचं चित्र आज दुपारपर्यंत स्पष्ट होईल. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. हरियाणामध्ये 90 जागांसाठी मतदान 21 ऑक्‍टोबर रोजी पार पडलं आहे. 90 पैकी 46 जागा जिंकण्याचं आव्हान भाजपासमोर आहे.


दरम्यान, भाजपाला हरयाणात ४० जागांवर आघाडी मिळाली आहे. तर बबिता फोगट दादरी मतदार संघातून आघाडीवर आहेत. त्यांना जवळपास २४९८ मतांची आघाडी मिळाली आहे.


सुरूवातीचे कल हाती आल्यानंतर मोहनलाल खट्टर आघाडीवर आहेत. भाजपाने 90 पैकी 75 जागांवर आम्ही निवडून येऊ असा दावा भाजपाने केला आहे. पुन्हा एकदा भाजपाचेच सरकार हरयाणात बसणार का? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.