Sushma Andhare Target Devendra Fadnavis| लोकसभा निवडणूकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. अनेक ठिकाणी राजकीय पक्षांकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी जागा वाटपाचा पेच निर्माण झाला आहे. अशातच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप -प्रत्यारोप करत आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. सुषमा अंधारे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस व विनोद तावडे यांची नावं घेऊन खोचक शब्दांत टिप्पणी केली आहे.
सुषमा अंधारेंची पोस्ट – Sushma Andhare Target Devendra Fadnavis|
विनोद तावडेंनी देवेंद्र फडणवीसांना चितपट केल्याचा दावा सुषमा अंधारेंनी केला असून त्यासाठी काही घडामोडींचा दाखला त्यांनी या पोस्टमध्ये दिला आहे. “पंकजा मुंडे-महादेव जानकर यांना उमेदवारी, जळगावचा जाहीर उमेदवार बदलण्याची तयारी, एकनाथ खडसे यांची पुन्हा अमित शाह यांच्याशी भेट, देवेंद्र फडणवीसांना भेटीसाठी दोन-दोन दिवस वाट पाहावी लागणं, पण त्याचवेळी नवनीत राणा यांना मात्र तासाभरात भेट… या सगळ्याचा अर्थ फडणवीसांना विनोद तावडेंनी चितपट केलं आहे”, अशी पोस्ट सुषमा अंधारे यांनी केली आहे.
पंकजा मुंडे , महादेव जानकर यांना उमेदवारी जळगाव चा उमेदवार बदलण्याची तयारी, श्री एकनाथ खडसे यांची पुन्हा अमित शहा यांच्याशी भेट, फडणविसाना 2-2दिवस वेटिंग आणि नवनीत राणा यांना एक तासाच्या आत भेट या सगळ्यांचा अर्थ..
फडणवीसांना विनोद तावडे यांनी चिटपट केलेय..! #आताकधीचयेणारनाही pic.twitter.com/znekHdKydV— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) April 6, 2024
देवेंद्र फडणवीसांवर नाराजी… Sushma Andhare Target Devendra Fadnavis|
विनोद तावडे २०१९ची लोकसभा व त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांवेळी देवेंद्र फडणवीसांवर नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर विनोद तावडेंना राष्ट्रीय राजकारणात अनेक जबाबदाऱ्या देण्यात आल्या. सध्या भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी विनोद तावडेंवर आहे. Sushma Andhare Target Devendra Fadnavis|
बीड मतदार संघातून प्रीतम मुंडे यांच्या जागी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याआधी भाजपकडून त्यांना डावलेले जात असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यातच भाजपने त्यांना तिकिट देत चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे, भाजपावर आणि देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करत 2020 साली पक्षाला रामराम करत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र ते पुन्हा स्वगृही परतणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा: