“दिल चाहता है’ आणि “जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटांनंतर आता रोड ट्रिपवर आधारित असलेल्या आणखी एका चित्रपटाची तयारी सुरू झाली आहे. यावेळी आता नायकांऐवजी नायिका झळकणार आहेत.
टायगर बेबीसोबत कॉलेब्रेट करण्यात आलेल्या या चित्रपटाचे नाव “जी ले जरा’ असे निश्चित करण्यात आले आहे. यात प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ आणि आलिया भट्ट मुख्य भूमिका साकारणार आहेत.
यासोबतच निर्मात्यांनी एक धमाकेदार वापसी केली असून निश्चितच ही 2021मधील सर्वांत मोठी घोषणा आहे. जी कथा झोया अख्तर, फरहान अख्तर आणि रिमा कागदी यांनी लिहिली आहे. विशेष म्हणजे रिमा कागदी, झोया अख्तर,
रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर द्वारा या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यातच फरहान अख्तर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून तो 2023मध्ये रिलीज करण्यात येणार आहे.
दरम्यान, रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी 1999 मध्ये ऍक्सेल एंटरटेन्मेंटची स्थापना केली होती. “दिल चाहता है’ आणि “रॉक ऑन’ या पहिल्या दोन्ही चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.