अल्फियाचे तिसरे सुवर्ण

फुजैराह: संयुक्त अरब अमिरातीत पार पडलेल्या ज्युनिअर आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नागपूरच्या अल्फिया पठाणने सुवर्णपदक पटकावत आपला दर्जा सिद्ध केला.

आल्फियाचे हे आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील तिसरे पदक आहे. स्पर्धेत 80 किलो वजनगटात खेळणाऱ्या 18 वर्षीय अल्फियाने अंतिम सामन्यात कझाकस्तानच्या डायना मगावूयेयेव्हाला पराभूत करीत सुवर्णपदक पटकाविले.

अल्फियाने 2018 मध्ये सर्बिया येथील नेशन्स चषक स्पर्धेत रजतपदक जिंकले होते व त्यानंतर गतवर्षी झालेल्या याच स्पर्धेत अल्फियाने कांस्यपदक पटकावले होते.

अल्फिया सेंट विन्सेंट पलोटी स्कूलची विद्यार्थिनी असून, प्रशिक्षक गणेश पुरोहित व अरुण बुटे यांच्या मार्गदर्शनात ती मानकापूर येथील क्रीडा संकुलात सराव करते. अल्फियाचे फिजिकल ट्रेनर गुड्डू ठाकूर आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.