महिला क्रिकेटचा राष्ट्रकुलमध्ये समावेश

मेलबर्न: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महिलांच्या टी-20 क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत महिलांच्या क्रिकेट सामन्यांचेही आयोजन केले जाईल. या
स्पर्धेत भारतासह आठ संघांचा सहभाग आहे. एकूण आठ सामने होतील. या स्पर्धेत एकूण 19 खेळ प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.

1998 मध्ये मलेशियातील राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्यांदा क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. यादरम्यान फक्त पुरुषांच्या गटाचा समावेश होता. या 50 षटकांच्या स्पर्धेत त्यादरम्यान 16 संघांनी सहभाग घेतला होता. यात दक्षिण आफ्रिकेचा संघ सुवर्णपदकाचा मानकरी ठरला होता.

2022 बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धा ही 27 जुलै ते 7 ऑगस्टदरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी या स्पर्धांमध्ये क्रिकेटला किती लोकप्रियता मिळते हे पाहिल्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद पुढील काळात या प्रकारच्या स्पर्धांमध्ये क्रिकेटचा समावेश करावा किंवा कसे हे ठरविणार आहे. 2028 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश व्हावा यासाठी परिषद प्रयत्नशील आहे. 1998 मध्ये मलेशियातील राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुषांच्या क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता.

त्यादरम्यान दक्षिण आफ्रिकेचा संघ सुवर्णपदकाचा मानकरी ठरला होता. तेव्हा पहिल्यांदाच फायनल जिंकणाऱ्या संघाला ट्रॉफीऐवजी पदक देऊन गौरवण्यात आले होते. या फायनलमध्ये आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर 6 गड्यांनी मात केली होती. ्‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌स्ट्रेलिया संघाचा प्रथम फलंदाजी करताना 49.3 षटकांत अवघ्या 183 धावांवर धुव्वा उडाला होता. प्रत्युत्तरात आफ्रिकेने 46 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात विजयाचे लक्ष्य सहज गाठले. ऑस्ट्रेलियाला रजत तर न्यूझिलंड संघाला ब्रॉंझ पदकावर समाधान मानावे लागले होते.

भारतानेदेखील यात सहभाग घेतला होता मात्र संघाला सरस कामगिरी करण्यात अपयश आले होते. सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला 1998 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत नववे स्थान पटकावले होते. या स्पर्धेच्या वेळी सहारा करंडक स्पर्धा देखील होती, त्यामुळे या स्पर्धेत भारताने तसा कमकुवत संघ पाठविला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.