नेमबाजीत कार्ले विजेता

मुंबई: महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्‍यपद स्पर्धेत रायगडच्या तेजस कार्लेने 247.3 गुणांसह 10 मीटर एअर रायफल प्रकारात पुरुष गटाचे अजिंक्‍यपद पटकाविले.

मुंबई उपनगरच्या 16 वर्षीय रुद्रांक्ष पाटीलने कार्लेला चांगलेच आव्हान दिले. मात्र त्याला 246.5 गुणांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ज्युनियर आणि युवा गटात 625.8 गुणांच्या जोरावर रुद्रांक्षने सुवर्णपदक पटकावले.

या दोन्ही गटात आधीश बारीने रजतपदक जिंकले. 225 गुणांसह त्याने दोन्ही गटात उपविजेतेपद मिळविले. तिसरा क्रमांक उपनगरच्याच निमेश जाधवने मिळविला. ज्युनियर आणि युवा गटात मुंबई उपनगरचे वर्चस्व राहिले. महाराष्ट्र रायफल संघटनेच्या मुंबई येथील रेंजवर ही राज्य स्पर्धा सुरू आहे.

निकालः 10 मीटर एअर रायफल- पुरुष : 1) तेजस कार्ले (रायगड; 247.3), 2) रुद्रांक्ष पाटील (मुंबई उपनगर; 246.5), 3) अधीश बारी (मुंबई उपनगर; 623.9). ज्युनियर : 1) रुद्रांक्ष पाटील (मुंबई उपनगर; 625.8), 2) अधीश बारी (मुंबई उपनगर; 623.9).

Leave A Reply

Your email address will not be published.