कराची – पाकिस्तान सुपर लिगमध्ये सहभागी झालेला इंग्लंडचा अष्टपैलू अलेक्स हेल्स याला करोनाची लागण झाल्याचे माजी कसोटीपटू रमिझ राजा याने माध्यमांशी बोलताना सांगितले होते. मात्र, खुद्द हेल्सने राजासह पाकिस्तान क्रिकेट मंडळाला फटकारले असून कोणतीही माहिती न घेता विनाकारण मला करोनाची लागण झाल्याचे जाहीर केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
करोनामुळे सध्या जवळपास सगळ्याच देशांत भीतीचे वातावरण आहे. त्यामुळेच आता आणखी कोणाला त्याची लागण नको म्हणून पाकिस्तान मंडळाने लिगचे उपांत्य तसेच अंतिम फेरीचे सामने रद्द केले आहेत.
हेल्सला करोना झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने मंडळाने हे सामने रद्द केले होते. तसेच राजा यांनीही कोणतीही माहिती न घेता हेल्सला करोनाची लागण झाल्याचे थेट माध्यमांना सांगितले होते, यावर हेल्सने राजा तसेच मंडळाला फटकारले आहे.