सराफ सुवर्णकार असोसिएशनतर्फे शेकडो वारकऱ्यांची सेवा
आळंदी – आषाढी पायी वारीनिमित्त आळंदीमध्ये वारकरी बांधवांना विविध ठिकाणी महाप्रसाद व अन्नदान करण्यात आले. यात प्रामुख्याने गेली 10 वर्षे ही अन्नदानाची परंपरा जपणारे येथील आळंदी सराफ सुवर्णकार असोशिएशनतर्फे शेकडो वारकऱ्यांना पालखी प्रस्थान सोहळ्याच्या दिनी अन्नदान करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष युवराज बेंद्रे, राजेंद्र शहाणे, सहसचिव विकास चव्हाण, खजिनदार सुरेश वर्मा, सदस्य भवर सिंग राजपूत, गोविंद बोराडे, संतोष दहिवळ, संतोष खोल्लम, राजेश शिरोळे, उमेश पाचपुते, अर्जुन गोरे, शिवाजी बेंद्रे, शेरसिंह राजपूत व निलेश चोपडा आदी या अन्नदान उपक्रमात सहभागी झाले होते.
त्याचबरोबर येथील अलंकापुरी प्रतिष्ठान तर्फे वारकऱ्यांना अन्नदान करण्यात आले प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण येळवंडे, येळवंडे, विशाल येळवंडे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोमवारी (दि. 12) सकाळी एनकेटी ट्रस्ट (ठाणावाला) यांच्या वतीने वारकऱ्यांना बुंदीचे वाटप करण्यात आले.
यावेळी शेठ नानजीभाई ठक्कर (ठाणावाला), नंदकुमार वडगावकर, ज्ञानेश्वर रायकर, मनोहर दिवाने, अशोक कांबळे, माजी नगराध्यक्षा शारदा पोपट वडगावकर, अशोक ढोरजे, युवा उद्योजक राहुल चव्हाण यांच्यासह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.