मुंबई – हॉलिवूडच्या कल्ट फिल्मचा जेव्हा विषय निघतो तेव्हा ‘गॉडफादर’ हे नाव आपोआप समोर येत.याच चित्रपटामुळे हॉलिवूड स्टार अल पचिनो अनेक दशकांपासून जगभरात लोकप्रिय आहे. अल पचिनो लवकरच बाबा होणार आहे. 83 वर्षीय अभिनेता आपल्या खाजगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो.
सध्या सोशल मीडियावर अल पचिनोचे सर्व फॅन्स त्याला शुभेच्छा देत आहेत. अल पचिनो चौथ्यांदा बाबा होणार आहे. त्याची 29 वर्षीय मैत्रीण नूर अलफल्ला लवकरच आई होणार आहे.’गॉडफादर’ या चित्रपटामुळे अल पचिनो जगभर प्रसिद्ध आहे. हा चित्रपट केवळ एक चित्रपट नसून पुढे येणाऱ्या सर्व पिढयांना कलाकृतीमधील बदल दाखवणारा चित्रपट ठरणार आहे.
नूर अलफल्ला आठ महिन्यांची गरोदर आहे. त्यामुळे अल पचिनो पुन्हा एकदा बाबा होणार आहे. आता पासूनच त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला आहे. तो एप्रिल २०२२ पासून २९ वर्षीय नूर अलफल्लाहला डेट करत आहे. काही महिन्यांपूर्वी दोघेही कॅलिफोर्नियातील फेलिक्सच्या रेस्टॉरंटमधून एकत्र बाहेर पडताना दिसले होते तेव्हा त्यांचं नातं सर्वांसमोर यायला सुरुवात झाली होती.
यापूर्वी अल्फालाने प्रसिद्ध गायक मिक जेगरला डेट केले होते, 2018 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले होते. त्याच वेळी, अल पचिनोचे 2020 मध्ये माजी गर्लफ्रेंड मीतल दोहानसोबत ब्रेकअप झाले होते. समोर आलेल्या माहितीनुसार पचिनो 33 वर्षीय ज्युली मेरीचे वडील देखील आहेत, जी माजी गर्लफ्रेंड जेन टेरंटची मुलगी आहे. याव्यतिरिक्त, तो 22 वर्षीय जुळी मुले अँटोन आणि ऑलिव्हियाचा आणखी एक माजी मैत्रीण बेव्हरली डी’एंजेलोचा पिता आहे.