नवी दिल्ली – जगाच्या पाठीवरील सर्वच देशांमध्ये सतत पुनर्जन्मविषयी चर्चा सु०रू असते. अमेरिकेतील एका 19 वर्षे तरुणाने पण आता अशा प्रकारचा दावा केला असून मागच्या जन्मामध्ये आपण एक हॉलीवुडचे अभिनेते होतो असे त्याने म्हटले आहे. हॉलिवूडचे अभिनेते असताना ज्या काही गोष्टी घडत होत्या त्या सर्व मला आठवत आहेत, असा दावाही या तरुणांनी केला आहे.रायन हेमंड असे या तरुणाचे नाव असून तो ओकलाहामा येथील रहिवासी आहे.
दहा वर्षांपूर्वी नऊ वर्षाचा असतानाही त्याने सर्वप्रथम असा दावा केला होता. 1940 आणि 1950 या दशकात हॉलीवुडमध्ये घडलेल्या सर्व घटना स्पष्टपणे आठवत आहेत असे त्याने आता म्हटले आहे. हॉलीवुडची प्रख्यात अभिनेत्री मरलीन मुनरो हिच्या बॉडीगार्डसनी आपल्याला धक्काबुक्की केली होती असा दावाही या तरुणाने केला आहे.
हॉलिवूडमध्ये फारसा प्रसिद्ध न झालेला पण चर्चेत असलेला मार्टी मार्टिन नावाचा एक अभिनेता होता, त्याचाच पुनर्जन्म माझ्या रूपाने झाला आहे असा दावा या तरुणाने केला आहे. मार्टिन हा एक एक्स्ट्रा नट होता नंतरच्या कालावधीमध्ये त्याने हॉलीवुडमधील एक एजंट म्हणून आपली कारकीर्द गाजवली होती. 1964 मध्ये त्याचे निधन झाले होते.
रायन हेमंड वयाच्या तिसऱ्या वर्षापासून आपला पुनर्जन्म झाल्याचा दावा करत आहे.प्रथम त्याच्या पालकांचा विश्वास नव्हता पण नंतर जेव्हा त्याच्या बोलण्यातून ह्या गोष्टींची पुनरावृत्ती व्हायला लागली तेव्हा त्यांनी या विषयाला प्रसिद्धी दिली. सातत्याने आपण एका हॉलीवूडच्या अभिनेत्याचा पुनर्जन्म घेतला आहे असा दावा तो करत राहिला. आपल्या मागच्या जन्मातील कुटुंबाला भेटण्यासाठी या जन्मातील आई-वडिलांनी आपल्याला तिथे न्यावे अशी मागणी तो सातत्याने करत आहे. पण या जन्मातील त्याच्या आई-वडिलांनी ती मागणी गांभीर्याने घेतलेली नाही अर्थात हॉलीवुड बाबत अनेक गोष्टी हा तरुण सहजपणे सांगत आहे त्याच्या आई-वडिलांनी या गोष्टी खऱ्या असल्याचेही मान्य केले आहे पण या विषयाबाबत आणखी पुढे जाण्यास मात्र या मुलाच्या पालकांनी नकार दिला आहे.