मुंबई – झी मराठी ‘खुपते तिथे गुप्ते’ मालिका चांगलीच चर्चेत आहे. मागचा भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मालिकेत हजेरी लावली तर यावेळी सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली आहे. या दरम्यानचा एक विडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.
‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमातील राज ठाकरेंचा आणखी एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये राज ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना फोन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमातील या व्हिडीओमध्ये अवधूत गुप्ते राज ठाकरेंना “हा जादूचा फोन डायरेक्ट कनेक्ट होईल. तुमच्या मनातील व्यक्तीला तो आपोआप लागणार आहे,” असं म्हणतो. यावर राज ठाकरे म्हणतात, “मला छत्रपती शिवाजी महाराजांशी बोलायचं आहे. त्यांनी पुन्हा महाराष्ट्रात अवतरावं आणि महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला तुम्ही कशासाठी झगडलात हे सांगावं, अशी माझी इच्छा आहे.”असं म्हणत राज ठाकरे यांनी आपली इच्छा सांगितली.