बॉलीवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक स्टार्स कलाकारांनाही करोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन यांच्यासह 4 कुटुंबातील सदस्य करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. अशा परिस्थितीत सर्व कलाकर अधिक सतर्क झाले आहेत. परंतु, अनलॉकनंतर हळूहळू शूटिंगही सुरू झाले आहे.
डबिंग स्टुडिओसह टीव्ही शोच्या सेटवर बरेच कलाकार परतले आहेत. अक्षय कुमारलाही मुंबईतील एका स्टुडिओच्या बाहेर स्पॉट केले होते. यावेळी जेव्हा एक फोटोग्राफर अक्षय कुमारचा फोटो क्लिक करत होता, तेव्हा एका व्यक्तीने तोंडावरील मास्क काढल्याने अक्षयने त्याला फटकारले. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार फोटोग्राफरला “नाकावर मास्क लावण्यास सांगत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीचा आहे. दरम्यान, अक्षय कुमार करोना व्हायरसबद्दल जागरूकता पसरवत आहेत. अलीकडेच, लॉकडाऊनदरम्यान त्याने एक जाहिरातीही शूट केली होती.
वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास अक्षय कुमारच्या “पृथ्वीराज’ चित्रपटाचे शूटिंग नोव्हेंबरमध्ये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अक्षय पुढच्या महिन्यात आपल्या “बेल बॉटम’ चित्रपटाचे शूटिंग ब्रिटनमध्ये करणार आहे. तिथून परतल्यावर तो “पृथ्वीराज’च्या सेटवर दिसेल.